मराठी पत्रकारांसाठी 6 जानेवारी हा दिवस खास असतो. महाराष्ट्रात मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळख असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस अर्थात 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. त्यांच्या सन्मानार्थ आज राज्यात साजरा केल्या जाणार्या मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा प्रियजणांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा