मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची आज (19 जानेवारी) पुण्यतिथी. भारतामध्ये मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्ध उभे ठाकलेले महाराणा प्रताप हे पहिले स्वातंत्र्यता सेनानी म्हणून देखील ओळखले जातात. त्यांचा जन्म 9 मे 1540 साली झाला. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजपूत राजे होते. 1572 साली महाराणा प्रताप हे मेवाडचे राजे झाले होते, उदय सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जबाबदारी आली आनि राजस्थानच्या मेवाड चे ते 13 वे राजपूत राजे बनले होते. 19 जानेवारी 1597 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सोशल मीडीयामध्ये त्यांचे विचार, फोटोज शेअर करून तुम्ही नक्कीच आदरांजली अर्पण करू शकता.
महाराणा प्रताप पुण्यतिथी






('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)