मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून मुंबई सह महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वात आले. पण पुढे हे बलिदान विस्मरणात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांच्या मागणीवरून राज्य सरकारने 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या 107 जणांचे आदराने स्मरण केले जाते. आजच्या या महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते संजय राऊत यांनी हुतात्म्यांप्रति आदरांजली अर्पण केली आहे. नक्की वाचा: स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या '107' हुतात्मांनी दिले होते बलिदान!
महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन....
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...#Maharashtra pic.twitter.com/szivKpxkVO
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 21, 2023
उप्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वस्व पणाला लावून लढा देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी अभिवादन...#Maharashtra #HutatmaSmrutiDin pic.twitter.com/XRXgB289lW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 21, 2023
संजय राऊत
मुंबईसह हे महाराष्ट्र राज्य व्हावे म्हणून ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली..बलिदान देऊन राज्य निर्माण केले अशा सर्व वीरांना अभिवादन!
मराठी माणूस तुमचे बलिदान कधीच विसरणार नाही!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/VvBuIU3JgD
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2023
लातूर पोलिस
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींस #लातूर जिल्हा #पोलीस दलाकडून विनम्र अभिवादन..!#हुतात्मा_दिन#Hutatmadin@CMOMaharashtra @DGPMaharashtra @SomayMunde @Iasvarshathakur @AnmolSagar19 pic.twitter.com/uOQV14EZ2g
— लातूर पोलीस-Latur police (@LaturPolice) November 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)