लालबागचा राजा आजपासून पुढील 10 दिवस भक्तांना आपलं दर्शन आणि आशिर्वाद देणार आहे. दरम्यान यंदा 2 वर्षांनी बाप्पा पुन्हा मंडपात आपल्या भव्य रूपात दाखल झाल्याने भाविकांनी देखील पहिल्या दिवसापासून दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. चिंचोळ्या गल्लीत बाप्पा विराजमान होत असल्याने आणि त्या तुलनेत भाविकांची मोठी गर्दी असल्याने अनेकदा राडे झाले आहेत. आजही दर्शनाच्या पहिल्याच दिवशी एक महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे.
लालबागचा राजा मंडपात धक्काबुक्की
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)