Buddha Purnima: बुद्ध पौर्णिमेचा उत्साह देशभरात ठिकठिकाणी साजरा होत आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुंबिनी येथे झाला. यामुळे दरवर्षी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा(Buddha Purnima)साजरी केली जाते. आज या खास दिवसाचे अवचित्य साधून उत्तराखंड येथील 'हर की पौरी' (Har ki Pauri) येथे भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. वैदिक कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी बुधवार, 22 मे रोजी संध्याकाळी 06:47 वाजता सुरू होईल आणि ही तिथी गुरुवार, 23 मे रोजी संध्याकाळी 07:22 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत वैशाख पौर्णिमा 23 मे रोजी असल्याने बुद्ध पौर्णिमा हा पवित्र सण आज म्हणजेचं 23 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. (हेही वाचा:Buddha Purnima 2024 Messages In Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त Greetings, SMS, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!)
बुद्ध पूर्णिमा के अवसर पर श्रद्धालुओं ने हरिद्वार में पवित्र डुबकी लगाई#Haridwar #BuddhaPurnima2024 pic.twitter.com/QpXOlGiMtJ
— News Nation (@NewsNationTV) May 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)