Balasore Train Accident: ओडिशातील बालेश्वर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 238 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 लोक जखमी झाले आहेत. रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक शनिवारी पहाटे बालेश्वरला पोहोचले आहेत. त्याचबरोबर लष्करही बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहे. याशिवाय नरेंद्र मोदी देखील अपघातस्थळी भेट देणार आहेत. या अपघातानंतरचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. यात तीन ट्रेनच्या बोगी रुळावरून घसरून खाली पडलेल्या दिसत आहेत. एएनआयने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने येथील दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आहे. (हेही वाचा - CM Naveen Patnaik On Odisha Train Accident: 'अत्यंत दुःखद रेल्वे अपघात'; ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भावूक प्रतिक्रिया)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)