अनेकदा लोक छंद किंवा शोसाठी अतिशय वेगाने गाडी चालवतात. कधी कधी वेगाची ही आवड माणसांचा जीव घेते. असाच एक प्रसंग पूर्वांचल एक्स्प्रेसमध्ये पहायला मिळाला जिथे चार मित्र एका कारमधून जात होते. चौघांनाही वेगाची आवड अशी होती की गाडी ताशी 230 किलोमीटर वेगाने धावू लागली. कारमध्ये उपस्थित असलेल्या एका मित्राला 'स्पीड वाढव आणि 300 च्या पुढे घेवुन जा' असे म्हणताना ऐकू येते. दरम्यान त्यांची कार एका कंटेनरमध्ये घुसली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. अपघातावेळी ते फेसबुकवर लाईव्ह होते.

सुलतानपूर जिल्ह्यातील हलियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर शुक्रवारी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शुक्रवारी ट्विट केले आणि म्हटले की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुलतानपूर जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करतानाच मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)