UP Dog Attack: लखनऊच्या सआदतगंज भागात घराबाहेर खेळत असताना एका सहा वर्षांच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या हल्लेत मुलीचा चावा देखील घेतला आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सहा कुत्र्यांनी येऊन अचानक हल्ला केला. चिमुकली मोठ्या भावासोबत खळत होती. मोठ्या भावाने वेळीच घराकडे धाव घेतली परंतु मुलीला कुत्र्यांनी चावा घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरडाओरड ऐकताच दुकानदारांने चिमुकलीला वाचवण्यासाठी धाव घेतला. कुत्र्यांच्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्या दोघांना ही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)