पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे सरकार गारद झाला आहे. तसेच देशात वसुलीची मागणी करणारे गृहमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत, असेही ते म्हणाले आहेत. ट्वीट-
#AnilDeshmukh 's resignation exposes Udhav Thackeray government to the hilt.
It is first time that we have seen police planting bombs and Home Minister asking for "Vasooli" in India.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)