Kadapa Shocker:  देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु आहे. तेवढ्यात आंध्र प्रदेशातून एक दुखद घटना समोर आली आहे. गणपतीचे विसर्जन करताना दोन तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना वीरापानयुनिपल्ले मंडळाची आहे. गणपतीचे विसर्जनासाठी मोगामुरु नदीत दोन तरुण पाण्यात उतरले होते. त्यावेळीस गणपतीचा भार अंगावर पडला आणि दोन तरुण पाण्यात बुडले. दोघांन्हा वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता परंतु त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वामसी आणि राजा असे मृत तरुणांचे नाव आहे. या घटनेनतंर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- जन्माष्टमीच्या दिवशी पुऱ्या खाऊन पडले होते 250 जण आजारी; आता नमुना तपासणीत कुट्टूच्या पिठात आढळली प्राण्यांची विष्ठा आणि लघवी)

पाण्यात बुडणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)