Terrorists of Lashkar-e-Taiba Arrested: पंजाबमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलला मोठा धक्का बसला आहे. अमृतसर पोलिसांनी केंद्रीय एजन्सीसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोघेही जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. डीजीपी गौरव यादव यांनी ही माहिती दिली. आरोपींकडून दोन आयईडी, दोन हातबॉम्ब, दोन मॅगझिनसह एक पिस्तूल, 24 काडतुसे, एक टायमर स्विच, आठ डिटोनेटर आणि चार बॅटरी जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे दहशतवादी मॉड्यूल लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य फिरदौस अहमद भट हाताळतो. त्यांच्याच प्रेरणेवरून पंजाबमध्ये सणांच्या काळात दहशत माजवण्याची योजना आखण्यात आली होती. आगामी काळात पंजाबमध्ये दहशतवादी घटना घडविण्याचे नियोजन सुरू होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)