उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. पुरीहून नवी दिल्लीला जाणारी निलांचल एक्स्प्रेस शनिवारी दुपारी निगोहन रेल्वे स्थानकाजवळील वाकड्या रुळांवरून जात असताना झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावली. रेल्वे ज्या लूप लाइनमधून जात होती ती सुमारे सात मीटर वाकडी असल्याचे आढळून आले. लोको पायलटला हादरे जाणवताच त्याने ट्रेन थांबवली. प्राथमिक तपासात उष्णतेमुळे ट्रॅक वाकडा झाल्याची बाब समोर येत आहे. मात्र, डीआरएमने चौकशीचे आदेश दिले आहेत. पुरीहून नवी दिल्लीला जाणारी ट्रेन क्रमांक 12875 निलांचल एक्स्प्रेस रायबरेलीमार्गे लखनऊला येत होती. शनिवारी दुपारी 2.15 च्या सुमारास ही गाडी निघोहन रेल्वे स्थानकावर पोहोचली.
The authorities have ensured adequate inquiry and action.#Lucknow #IndianRailways (Satyam Kumar)https://t.co/w0jzNcSYes
— IndiaToday (@IndiaToday) June 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)