Tamilnadu News: तामिळनाडूत गुगल मॅपच्या मदतीने एका व्यक्तीला त्याचा चोरीला गेलेला फोन आणि बॅग परम मिळाला आहे. सोशल मीडियावर राज भगत पलानीचामी नावाच्या व्यक्तीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने सांगितले की,  Google Maps ने त्याला त्याच्या वडिलांची चोरी झालेली बॅग आणि फोन शोधण्यात मदत केली. त्याचे वडिल नागर कोईल काचेगुडा एक्स्प्रेसने प्रवास करत होते. दरम्यान एकाने त्यांचा फोन आणि बॅग चोरली, या घटनेची माहिती कशी बशी त्यांनी त्यांच्या मुलाला दिली. ट मुलाने गुगल मॅपचा वापर करत चोराने फोन बंद केला नाही आणि लोकेशन शेअरिंग सुरू असल्याचे यांनी सांगितले. नागरकोइल येथील बसस्थानकावर चोरट्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी या गुगल मॅफचा विशिष्ट पध्दतीने वापर केला. चोरीचा माल जप्त करण्यात आला असून चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)