तेलंगणातील (Telangana) करीमनगर जिल्ह्यातील व्यंकटयपल्ली मंडल येथील रहिवासी असलेल्या तरुणीची शनिवारी अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंब आणि शेजाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. 16 वर्षीय प्रदीप्ती नुकतीच बारावी उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये दाखल झाली होती. महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फ्रेशमन कार्यक्रमात नृत्य करताना प्रदीप्तीला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. मृताच्या आईने सांगितले की, मुलीच्या लहानपणीच तिच्या हृदयात छिद्र आढळले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र पैशाअभावी ते होऊ शकले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)