Airport Shuttle Bus Crashed Into A Pole: बंगळुरू विमानतळावर शटल बस खांबाला आदळली; अनेक प्रवासी जखमी, Watch Video

बसमध्ये 17 प्रवाशांपैकी 15 प्रवासी आणि दोन चालक दलाचे सदस्य होते. बेंगळुरू विमानतळ प्राधिकरणाने एक निवेदन जारी करून सांगितले की, बस ऑपरेटरच्या सहकार्याने या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

Airport Shuttle Bus Crashed Into A Pole: बंगळुरू विमानतळावर शटल बस खांबाला आदळली; अनेक प्रवासी जखमी, Watch Video
Airport Shuttle Bus Crashed Into A Pole (PC - PTI)

Airport Shuttle Bus Crashed Into A Pole: बंगळुरू विमानतळावर झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. प्रत्यक्षात प्रवाशांना घेऊन जाणारी शटल बस एका खांबाला धडकल्याने बसमधील 10 प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे प्राथमिक उपचारानंतर पाच जणांना घरी सोडण्यात आले. अपघाताचा तपास करण्यात येत आहे. रविवारी पहाटे 5.15 वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शटल बसमधून 17 जण टर्मिनल 1 ते टर्मिनल 2 कडे जात होते. दरम्यान, बस टर्मिनल 2 जवळील खांबाला धडकली. त्यामुळे बसमधील 10 जण जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी पाच जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये 17 प्रवाशांपैकी 15 प्रवासी आणि दोन चालक दलाचे सदस्य होते. बेंगळुरू विमानतळ प्राधिकरणाने एक निवेदन जारी करून सांगितले की, बस ऑपरेटरच्या सहकार्याने या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. (वाचा - Jammu and Kashmir Earthquake Tremors: जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी, भदरवाह खोऱ्यात जाणवले भूकंपाचे धक्के; लोक घराबाहेर आले)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2023 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).