Anil Antony Joins BJP: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बीबीसीच्या वादानंतर अनिल यांनी जोरदार विरोध करत काँग्रेस पक्ष सोडला. केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे माजी संयोजक अनिल अँटनी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही मुरलीधरन, केरळ भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 2002 च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादानंतर अनिल अँटनी यांनी जानेवारीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अनिल अँटोनी यांचे वडील ए.के.अँटनी काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री होते. याशिवाय ते केरळचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. ए के अँटोनी यांचे नाव बड्या नेत्यांमध्ये घेतले जाते. (हेही वाचा - DMK MLAs Driving Bus: डीएमके आमदाराने बस चालवली, खांबाला धडकवली खड्ड्यात घातली (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)