BJP Veteran LK Advani Hospitalised: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना 6 ऑगस्ट रोजी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात (Delhi Apollo Hospital) दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. अडवाणी यांना न्यूरोलॉजिस्ट डॉ विनित सुरी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले आहे. याआधी जुलैमध्ये अडवाणी यांना वृद्धापकाळाशी संबंधित समस्यांमुळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स-दिल्ली) येथे दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांनी 2002 ते 2004 पर्यंत भारताचे उपपंतप्रधान आणि 1999 ते 2004 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम केले आहे.
BJP Veteran LK Advani Hospitalised, Condition Stable: Sources https://t.co/xxg3dagkMi pic.twitter.com/Ams9IyWw07
— NDTV News feed (@ndtvfeed) August 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)