SBI Q4 Results: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बँकेने सांगितले की, आर्थिक वर्ष 24 च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत नफ्यात 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीतील नफा 16,694.5 कोटी रुपयांवरून 20,698.3 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत नफ्यात 24 टक्के वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना खूश करण्यासाठी बँकेने प्रति शेअर 13.70 रुपये लाभांश दिला आहे. बोर्डाने 22 मे 2024 ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे, तर लाभांश 5 जून 2024 रोजी दिला जाईल.
पाहा पोस्ट:
#4QWithCNBCTV18 | State Bank of India reports #Q4 earnings
➡️Net profit at ₹20,698.3 cr vs CNBC-TV18 poll of ₹13,081 cr pic.twitter.com/ijqjUD6kBF
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) May 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)