Satyendar Jain Heath Update: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांची प्रकृती आणखी खालावली आहे. आता त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयातून एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना एलएनजेपी रुग्णालयातील आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6 वाजता सत्येंद्र जैन सीजे-7 रुग्णालयाच्या एमआय रूमच्या बाथरूममध्ये पडले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. पाठ, डावा पाय आणि खांदा दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले. (हेही वाचा - Hyderabad Murder Case: हैदराबादमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखे कृत्य! लिव्ह-इन पार्टनरने कटर मशिनने केले गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे 6 तुकडे)
AAP leader Satyendar Jain admitted to the ICU of LNJP hospital in Delhi after he was referred here from Deen Dayal Upadhyay Hospital. Jain is on oxygen support. He was taken to Deen Dayal Hospital earlier today when he felt dizzy and fell in the bathroom of Tihar jail: AAP… pic.twitter.com/iwJ9HP3a3a
— ANI (@ANI) May 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)