Sachin Tendulkar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minster Narendra Modi) उद्योजक मुकेश अंबानी यांच्या जामनगरातील वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू सेंटर 'वनतारा'चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी रेस्क्यू केलेल्या प्राण्यांसोबत काही क्षण घालवले. 'वनतारा' हे वाईल्ड एनिमल रेस्क्यू सेंटर जामनगर येथील रिफायनरीच्या जवळ वसलेले खाजगी अभायारण्य आहे. यात अनेक अनोखे प्राणी जतन करुन ठेवले आहेत. त्यानंतर आज सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) याने वनतारामध्ये वन्यजीव संवर्धनासाठीच्या अनंत अंबानी यांच्या वचनबद्धतेबद्दल अनंत अंबानी (Anant Ambani) आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील वनतारा, सुरक्षित आणि शाश्वत वातावरणात प्राण्यांचे कल्याण सुनिश्चित करताना त्यांचे बचाव आणि पुनर्वसन करण्यावर लक्ष केंद्रित करते. वन्यजीव संवर्धनासाठीच्या समर्पणाबद्दल या उपक्रमाचे विविध स्तरांकडून कौतुक होत आहे.

सचिन तेंडुलकरचे ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)