देशातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत किरकोळ महागाई दरात थोडीशी घट झाली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्के होता. मे महिन्यात हा आकडा 7.04 टक्क्यांवर आला आहे. खाद्यपदार्थ स्वस्त झाल्यामुळे मे महिन्यात किरकोळ महागाई 7.04 टक्क्यांवर आली आहे. मात्र, गेल्या सलग पाच महिन्यांपासून ते आरबीआयच्या समाधानकारक पातळीपेक्षा वरच राहिले आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (CPI) महागाई दर 7.79 टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ महागाई 6.3 टक्के होती.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)