Governor of the Year: सेंट्रल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग, लंडनतर्फे गव्हर्नर ऑफ द इयर - 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सेंट्रल बँकिंगने मार्च 2023 मध्ये आरबीआय गव्हर्नरसाठी हा पुरस्कार जाहीर केला होता. इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जर्नल सेंट्रल बँकिंगने हा सन्मान दास यांना दिला आहे, जे 2018 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद सांभाळत आहेत. हा सन्मान मिळवणारे ते दुसरे आरबीआय गव्हर्नर आहेत, त्यापूर्वी 2015 मध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना प्रथमच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (हेही वाचा - Modani Thali: 'मोदानी थाली- खुद भी खाऊंगा, मित्र को भी खिलाऊंगा'; काँग्रेस पक्षाने उडवली केंद्र सरकारची खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)