Ratlam Train Derail: मध्य प्रदेशात रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून महाराष्ट्रातील मिरज जंक्शनकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. रतलाम-दाहोद रेल्वे विभागादरम्यान इंजिनसह रेल्वेचा पॉवर कोचही रुळावरून घसरला. या घटनेबाबत पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाचे जनसंपर्क अधिकारी खेमराज मीना यांनी सांगितले की, यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. हजरत निजामुद्दीन आणि मिरज जंक्शन दरम्यान धावणाऱ्या दर्शन एक्सप्रेस ट्रेनचे इंजिन आणि पॉवर कोच रुळावरून घसरले. घटनेची माहिती मिळताच रतलाम विभागाची वैद्यकीय आणि अपघात मदत गाडी घटनास्थळी पोहोचली. अनेक अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना भोपाळपासून 320 किमी अंतरावर असलेल्या झाबुआ जिल्ह्यातील अमरगढ रेल्वे स्थानकाजवळ घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)