Punjab Cop Suspended: तरुणी आज काल रिल्स बनवण्यासाठी काय करतील याचा नेम नलतो. पंजाबमधील एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंजाबमधील ( Punjab) एका पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या ड्युटीवरील वाहन रीलसाठी महिलेला वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्याला कामावरून निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर (Social Media) तीचा पोलिस वाहनासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालंधरमधील स्टेशन हाऊस ऑफिसरला एका इंस्टाग्राम रीलसाठी महिलेला पोलिस वाहन वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पोलिस वाहनाच्या बोनेटवर बसून एक तरुणी पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी पोलिसांच्या गणवेशातील एक पुरुषही महिलेसोबत दिसत आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला. या घटनेअंतर्गत पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात दोन तरुणांना पोलीस स्टेशन बाहेर रिल्स काढणे महागात पडले होते त्या दोघांना पोलीसांनी अटक केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)