बिहारची राजधानी पाटणा येथील जागतिक दर्जाच्या पाटणा जंक्शनवर (Patna Junction) रविवारी ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना कुटुंबियांसमोर लाजिरवाणे व्हावे लागले. प्रत्यक्षात जाहिरातीऐवजी दानापूर विभागातील पाटणा जंक्शनवर लावण्यात आलेल्या टीव्हीवर (LED Screen) अश्लील चित्रपटाचे प्रसारण सुरू झाले. त्यावेळी सर्व फलाटांवर मोठी गर्दी होती. लोक कुटुंबासह स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होते. अचानक अश्लील चित्रपट दाखविल्याने उपस्थित लोक हादरले. या घटनेनंतर जाहिरात एजन्सीच्या नियंत्रणाखाली छापा टाकला असता तेथील कर्मचारी अश्लील चित्रपट पाहताना आढळून आले. मात्र, आरपीएफला पाहताच नियंत्रण कक्षात बसलेल्या जवानांनी ते तात्काळ हटवले. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)