संसदेचं आजपासून विशेष सत्र बोलावणयात आलं आहेत. चंद्रयान 3 ची यशस्वी मोहीम आणि त्यानंतर भारताने जी 20 समिट चं यजमानपद भूषवत जागतिक नेत्यांचं भारतामध्ये केलेलं आदरातिथ्य यानंतर वातावरण सकारत्मक झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता मागील 75 वर्ष आणि पुढे भारताचा होणारा प्रवास यासाठी संसदेचं हे विशेष सत्र महत्त्वाचं ठरणार आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे. नव्या संसद भवनामध्ये आता भविष्यातील अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहेत असं म्हणताना हे अधिवेशन लहान असलं तरी महत्त्वाचं असल्याचाही उल्लेख मोदींनी केला आहे. यावेळी विरोधकांकडूनही प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

पहा मोदींची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)