Supriya Sule : सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवार असल्यामुळे यंदाची लोकसभा (Lok Sabha Election2024 ) सोपी नाही, हे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारासाठी लोकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट पुणे ते दौंड डेमूने प्रवास केला. आज दौंड तालुक्यात सुप्रिय सुळेंचा दौरा आहे. डेमूमध्ये प्रवासादरम्यान, त्यांनी लोकांशी संवाद साधला. आपण केलेल्या कामांची माहिती लोकांना दिली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. महाविकास आघाडीचा प्रचार करत सुप्रिया सुळे दौंडला पोहोचल्या. (हेही वाचा :Supriya Sule Plays Badminton: प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे दिसल्या बॅडमिंटन खेळताना (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)