गोव्यामध्ये आज 40 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. शिवसेना, भाजपा, आप, तृणमुल कॉंग़्रेस, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवत ही निवडणूक चुरसीची केली आहे. दरम्यान 10 मार्चला या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी भाजपाकडून अपेक्षित तिकीट न मिळाल्यानं पक्षाला रामराम करत ते अपक्ष निवडणूकीला सामोरे जात आहेत.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क
Goa CM Pramod Sawant casts his vote in Kothambi #GoaElections2022 pic.twitter.com/6m1qTcJmdn
— ANI (@ANI) February 14, 2022
प्रमोद सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यापूर्वी ते Shree Rudreshwar Devasthan, Harvalem येथे पत्नीसोबत देवदर्शनाला देखील पोहचले.
उत्पल पर्रिकर
Utpal Parrikar, son of former Goa CM late Manohar Parrikar visits polling booths in Panaji. He is contesting as an independent candidate in the constituency.#GoaElections2022 pic.twitter.com/7sxzdtLHmN
— ANI (@ANI) February 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)