PM Narendra Modi Takes Blessings From Sadhus: आज देशभरातील राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज प्रभू राम (Lord Ram) यांची अयोध्येत प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. दरम्यान, राम लल्लाचा अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi) गर्भगृहातून बाहेर आले आणि त्यांनी श्री रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य संतांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. राम लल्लाच्या अभिषेकाशी संबंधित कार्यक्रमाला पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी मंदिराच्या बाहेर उपस्थित लोकांना हात जोडून अभिवादन केले. रामललाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. रामललाच्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर रोळी, चंदन किंवा सिंदूर लावल्यानंतरही तिची चमक कमी होत नाही. मकराना दगडात बनवलेली मूर्ती जमिनीपासून 7 फूट उंच आहे. रामलला 3.4 फूट उंच कमळाच्या आसनावर विराजमान आहेत. मूर्तीवर स्वस्तिक, गदा, ओम, शंख, सूर्य आणि चक्र बनवण्यात आले आहे. 51 इंची रामलला मूर्तीचे वजन 150 किलो आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला वर्तुळात विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत. (वाचा - First look of Ram Lalla in Ayodhya after Pran Partistha: अयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पहा श्रीरामांचे मोहक रूप (Watch Video))
पहा व्हिडिओ -
#WATCH | PM Narendra Modi takes blessings from 'sadhus' at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya.
#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/rgVHDQzIAi
— ANI (@ANI) January 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)