Karnataka: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकातील मंड्या येथे पोहोचले असून, तेथे त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून नागरिकांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी कोट्यवधी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मंड्यातील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, '2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात त्यांनी गरिबांना उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती, काँग्रेस सरकारने गरिबांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांची लूट केली. काँग्रेसने गरिबांच्या दु:खाची कधीच पर्वा केली नाही.

पंतप्रधान @narendramodi यांचं आज कर्नाटकात मांड्या इथं आगमन यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून नागरिकांनी फुलांचा वर्षाव करुन त्यांचं स्वागत केलं.@DDNewslive @DDNewsHindi #Karnataka pic.twitter.com/Th4820i4o4

— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 12, 2023

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)