भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अनेक खेळाडूंकडून होत आहे. याच्या निषेधार्थ आज कुस्तीपटू हरिद्वारमधील गंगेत त्यांची पदके विसर्जित करणार आहेत. यासाठी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया हरिद्वारला पोहोचले आहेत. येथे ते हरकी पायडीवर त्यांची पदके गंगेत अर्पण करतील. पैलवानांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हरकी पायडी येथे पोहोचले आहेत. गंगा ही माता असल्याने आम्ही ही पदके गंगेत सोडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गंगा जितकी पवित्र मानतो तितकेच पवित्र कठोर परिश्रम करून आपण ही पदके मिळवली होती. ही पदके संपूर्ण राष्ट्रासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदक ठेवण्यासाठी योग्य स्थान पवित्र माता गंगा असू शकते, असे म्हणत कुस्तीपटू त्यांची पदके गंगेत अर्पण करतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)