कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमधील हिजाब बंदी उठवण्यास नकार देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर, भारताचे सर्वोच्च न्यायालय उद्या (13 ऑक्टोबर) आपला निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर याबाबत 10 दिवस सुनावणी झाली आहे. यादरम्यान न्यायालयाने हिजाब समर्थक याचिकाकर्त्यांव्यतिरिक्त कर्नाटक सरकार आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा युक्तिवाद ऐकला. आता उद्या सर्वोच्च न्यायालय याबाबत निकाल देणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)