Vande Bharat Trains: उन्हाळ्यात वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि उन्हाचा तडका लक्षात घेता प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना 500 मिली पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार म्हणाले की, रेल्वे सर्व वंदे भारत ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाला सीटवर अर्धा लिटर रेल्वे नीर पॅकेज्ड पेयजल (PDW) बाटली प्रदान करेल. त्यानंतर मागणीनुसार प्रवाशांना 500 मिलीची दुसरी रेल नीरची पॅकेज्ड बाटली कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रदान केली जाईल. (हेही वाचा: India Railway: जनरल क्लासने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेकडून 20-50 रुपयांत स्वस्तात जेवण)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)