उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये मॉब लिंचिंगपासून वाचण्यासाठी एका तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. या मुलाने चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने त्याचा पाठलाग सुरु केला होता. या जमावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो ओव्हर ब्रिजवर चढला. त्यानंतर लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आल्यानंतरही तरुण खाली आला नाही, त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न केले, मात्र तरुण खाली आला नाही. एकूण आठ तास तो पोलिसांना वर चकमा देत राहिला. त्यानंतर अचानक आलेल्या पावसाने प्रकरण आणखी बिघडवायला सुरुवात केली. पावसामुळे तरुण घसरला आणि सुमारे 100 फूट खाली रस्त्यावर पडला. खाली पडताच त्याचा मृत्यू झाला. आता तरूण घसरला की, त्याने पुलावरून उडी मारली याबाबत स्पष्टता नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
अहवालानुसार, लाईन बाजार येथील शिवपार गावात पहाटे ग्रामस्थांनी मूल चोरीच्या संशयावरून दोन तरुणांचा पाठलाग केला. एकाला लोकांनी पकडले पण दुसरा ओव्हरब्रिजवर चढला. प्रथम पकडलेल्या तरुणाला मारहाण केल्यानंतर पोलिसांना पाचारण करून त्याला ताब्यात देण्यात आले. (हेही वाचा: Kadapa Shocker: गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना)
Jaunpur : ग्रामीणों ने रात के अंधेरे में बच्चा चोर समझ कर दो लोगों को दौड़ाया, एक को किया पुलिस के हवाले तो दूसरा जौनपुर वाराणसी हाईवे पर बने फुट ओवरब्रिज के लगभग 40 फुट टॉप पर चढ़ गया। आठ घंटे तक चला हाई वोल्टेज ड्रामा। पुलिस,फायर ब्रिगेड और एनएचएआई की टीम को छकाते हुए लगभग 40… pic.twitter.com/cEikO3F0Ek
— Uttar Pradesh Times (@UPTimesLive) September 10, 2024
उत्तर प्रदेश के जिला जौनपुर में मॉब लिंचिंग से बचने के लिए अवनीश कुमार ब्रिज पर चढ़ गया और कूदकर जान दे दी।
गांववालों ने उसे बच्चा चोर कहकर दौड़ा दिया था। भीड़ से बचने को वो एक ओवरब्रिज पर चढ़ गया। 8 घंटे तक ऊपर ही चढ़ा रहा। पुलिस जैसे ही ऊपर चढ़ी, वो नीचे कूद गया। pic.twitter.com/WckidEWoyE
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)