आजकाल सोशल मिडियासाठी रील बनवण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, यासाठी लोक कोणत्याही थराला जात आहे. आता यूपीच्या लखीमपूर-खेरीमध्ये अशीच रीलबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका कुटुंबाला रील बनवणे अतिशय महागात पडले आहे. हे कुटुंब रेल्वे ट्रॅकवर रील बनवत उभे होते, यावेळी रेल्वेची धडक बसल्याने संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. हे प्रकरण खेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑइल रेल्वे स्थानकाजवळचे आहे. बुधवारी सकाळी लखनौहून पिलीभीतकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला ऑइल स्टेशनजवळील मोठ्या कालव्यावर हा अपघात झाला.

अहवालानुसार, सीतापूरच्या लहरपूर येथील मोहल्ला शेख सराय येथे राहणारे जोडपे आपल्या लहान मुलाला मांडीवर घेऊन रेल्वे पुलाजवळ रील बनवत होते. यावेळी हरगावहून लखीमपूरकडे जाणारी रेल्वे आली आणि तिची धडक बसून तिघांचाही मृत्यू झाला. मोहम्मद अहमद (30), पत्नी नाजमीन (24) आणि त्यांचा 2 वर्षांचा मुलगा अरकम अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोस्ट पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह तातडीने रुळांवरून काढण्यात आले. यानंतर ट्रेन पुढे सरकली. हे जोडपे आपल्या मुलासह जत्रा पाहण्यासाठी केवंतिकाला हरगाव येथे आले होते. येथून ते लखीमपूर खेरी जिल्ह्यातील उमरिया रेल्वे पुलाजवळ फिरायला आले आणि त्यांनी रेल्वे रुळावर रील बनवण्यास सुरुवात केली, यावेळी त्यांना ट्रेनची धडक बसली. (हेही वाचा: Reel Goes Wrong: रील बनवताना तोल गेला अन् तरूणी गंगा नदीत पडली)

रेल्वे रुळावर रील बनवताना तिघांचा मृत्यू-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)