उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, ट्रेंडमध्ये झपाट्याने बदल होताना चित्र दिसत आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. ट्रेंडमध्ये भाजपने 243 चा आकडा ओलांडला आहे, तर सपाची सायकल अजूनही 90 च्या मागे आहे. निकालात हे कल असेच राहिले तर, यूपीमध्ये पहिल्यांदाच एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने येईल.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या मुख्यमंत्री योगी, अखिलेश यादव, केशव प्रसाद मौर्य, शिवपाल यादव, आझम खान, अब्दुल्ला आझम आघाडीवर आहेत, तर ओमप्रकाश राजभर, स्वामी मौर्य हे पिछाडीवर आहेत.
#UttarPradeshElections2022 #ElectionResults
CM Yogi- Leading
Akhilesh- Leading
Keshav Prasad Maurya: Leading
Shivpal Yadav- Leading
OP Rajbhar- Trailing
Swami Maurya- Trailing
Azam Khan- Leading
Abdullah Azam- Leading
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)