काही दिवसांपूर्वी आरबीआयने (RBI) G-20 देशांतील प्रवाशांना भारतात राहताना मोबाईल-आधारित युपीआय (UPI) वापरण्याची परवानगी देण्यासाठी एक परिपत्रक जारी केले होते. आता आरबीआयने ही सेवा सुरु केली आहे ज्याद्वारे भारतात येणारे सर्व इनबाउंड प्रवासी ते भारतात असताना युपीआयचा वापर करून स्थानिक पेमेंट करू शकतील. सुरुवातीला ही सेवा G-20 देशांतील प्रवाशांसाठी, निवडक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर (बेंगळुरू, मुंबई आणि नवी दिल्ली) उपलब्ध आहे.

पात्र प्रवाशांना पेमेंट करण्यासाठी युपीआयशी लिंक केलेले प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) वॉलेट जारी केले जातील. जी20 देशांचे प्रतिनिधी विविध बैठकीच्या ठिकाणी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)