आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावणे, चिडणे इतकेच नाही तर आत्महत्येचा विचार करणे असे प्रकार वाढले आहेत. विशेषतः तरुणांमध्ये अशा गोष्टी जास्त दिसून येतात. मात्र जेव्हा त्यांना आपली चूक कळते तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असते. अशीच एक घटना यूपीतील संभलमधून समोर आली आहे. या ठिकाणी घरगुती वादातून एका तरुणाने रागाच्या भरात विषारी द्रव्य प्राशन केले. मात्र विषारी पदार्थाचा शरीरावर परिणाम होऊ लागल्याने तरुण घाबरला व जीव वाचवण्यासाठी त्याने आरडाओरडा करत धावत जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. 'डॉक्टर साहेब, कृपया मला वाचवा, मी विष प्राशन केले आहे', असे ओरडत तो रुग्णालयात पोहोचला. तरूण रुग्णालयात दाखल होताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून शरीरातील विष काढण्यासाठी औषधे देण्यास सुरुवात केली. युवकाने विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती मिळताच कैलादेवी पोलीस ठाण्यानेही जिल्हा रुग्णालय गाठून युवकाच्या कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कैला देवी पोलीस स्टेशन हद्दीतील रायपूर गावात राहणाऱ्या 24 वर्षीय सतेंद्रने रविवारी दुपारी घरातील वादाचा राग मनात धरून विषारी द्रव्य प्राशन केले. (हेही वाचा: Snake Found Inside Bike's Helmet: बाप रे बाप! हेल्मेटमध्ये सापडला साप; पहा व्हायरल व्हिडिओ)
पहा व्हिडिओ-
"डॉक्टर साहब मुझे बचा लो, मैंने जहर खा लिया"
◆ वायरल वीडियो संभल जिला अस्पताल का बताया जा रहा#UttarPradesh | #Sambhal | Sambhal pic.twitter.com/LEBtLORI5c
— News24 (@news24tvchannel) January 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)