Snake Found Inside Bike's Helmet: साप (Snake) हा असा प्राणी आहे की, ज्याला पाहून माणसांची अवस्था बिकट होते. तुमचे रक्षण करणाऱ्या हेल्मेटच्या आत हा साप बसला आणि तेच हेल्मेट तुम्ही डोक्यात घातले तर काय होईल? याची साधी कल्पनाही तुम्ही करू शकत नाहीत. परंतु, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेल्मेटमध्ये साप बसलेला दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हेल्मेट दिसत आहे, हेल्मेटमध्ये काहीही दिसत नाही. पण जेव्हा एक व्यक्ती काठी घेऊन हेल्मेटच्या आतील कपडे काढते तेव्हा दिसणाऱ्या दृश्याने सर्वांना धक्का बसतो. कारण, हेल्मेटच्या आतून एक साप बाहेर येताना दिसत आहे. हेल्मेटमध्ये असलेला साप अतिशय धोकादायक आणि विषारी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ शेअर करून लोक हेल्मेट वापरणाऱ्यांना सावध करत आहेत. तसेच हेल्मेट घालण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला देत आहेत. (Snake Attack in Karnataka Video: घराच्या दारात पडून असलेल्या सापाच्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावली लहान मुलगी; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Watch))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)