मागच्या वर्षी शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मुला-मुलींची लग्ने पार पडली. यामध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचे लग्नही चर्चेचा विषय ठरले. मोठ्या थाटामाटात, अगदी शाही पद्धतीने अक्षय आणि प्रियंका यांचे लग्न अहमदनगर येथे पार पडले. या लग्नाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. अक्षयच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ याआधी समोर आले आहेत परंतु आता, लग्नानंतरच्या नवपरिणीत जोडप्याचा खेळाचा एक अनसीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अक्षय आणि प्रियंका आपल्या कुटुंबाच्या सानिध्यात लग्नानंतरचे खेळ खेळताना दिसत आहेत.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)