Ujjwala Yojana: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारची मोठी भेट; एका वर्षासाठी सिलिंडरवर मिळणार 300 रुपये अनुदान
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मोदी मंत्रिमंडळाने महिलांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारे 300 रुपये अनुदान एक वर्षासाठी वाढवण्यात आले आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजना (फोटो सौजन्य-ट्वीटर)
Socially
टीम लेटेस्टली
|
Mar 07, 2024 07:53 PM IST
Ujjwala Yojana: येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षातही उज्ज्वला लाभार्थ्यांना प्रति 14.2-किलोच्या सिलिंडरमागे 300 रुपये अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. योजनेच्या 10.27 लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात अनुदान मिळेल. यासाठी 2024-25 साठी एकूण खर्च 12,000 कोटी रुपये असेल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मोदी मंत्रिमंडळाने महिलांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारे 300 रुपये अनुदान एक वर्षासाठी वाढवण्यात आले आहे. या अंतर्गत वर्षाला 12 सिलिंडर उपलब्ध होतील. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. (हेही वाचा:
International Women's Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्ली विमानतळावर 'पिंक शिफ्ट'चे आयोजन; तिन्ही टर्मिनलवर महिला सांभाळणार कामकाज)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)