सुरत न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्यावर कोर्टाने ही कारवाई केल्यानंतर संसदेने त्यांची खासदारकी रद्द केली. यानंतर काँग्रेस (Congres) आक्रमक झालं आहे. आज देशभरात वेगवेगळ्या राज्यात संकल्प सत्याग्रह काँग्रेसकडून सुरू केला आहे. तेलंगणाच्या (Telangana) काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ रविवारी हैदराबाद येथील पक्ष कार्यालयात सत्याग्रह केला.काँग्रेसचे तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पक्षाचे राज्य मुख्यालय गांधी भवन येथे आंदोलनाचे नेतृत्व केले.
पहा फोटो -
Telangana #Congress leaders staged satyagraha at the party office in Hyderabad on Sunday to protest against disqualification of party leader #RahulGandhi from #Parliament.
Manikrao Thakare, in-charge of Cong for Telangana, led the protest at Gandhi Bhavan, state HQ of the party. pic.twitter.com/nc298gnNKy
— IANS (@ians_india) March 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)