भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी मानवी आयुष्याच्या जडघडणीत मोलाचा वाटा उचलणार्या 'शिक्षका'प्रती आपलं ऋण व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. शिक्षक दिनाप्रती ज्ञानदानाचं काम अविरत करणार्या शिक्षकांना धन्यवाद म्हटलं जातं. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सामान्य नेटकर्यांनी देखील शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
I pay my respects to Dr. S. Radhakrishnan on his Jayanti and recall his distinguished scholarship as well as contributions to our nation.
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2021
खासदार अमोल कोल्हे
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. लसर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन. शैक्षणिक क्षेत्रात ४० वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. pic.twitter.com/48Rhl30vgw
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 5, 2021
वर्षा गायकवाड
"भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवतो, तो खरा शिक्षक"
भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांचे विचार सार्थ ठरवण्यासाठी झटणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #ThankATeacher @thxteacher @MahaDGIPR pic.twitter.com/4tbr0LtXNC
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 5, 2021
राधाकृष्ण विखे पाटील
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचा जन्मदिन भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९ ते १९४८ या कालावधीत म्हणजेच तब्बल ४० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला आणि अतिशय मोलाचे योगदान दिले. pic.twitter.com/blFDTHikmy
— R Vikhe Patil (@RVikhePatil) September 5, 2021
आमदार रोहित पवार
माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
समाज आणि देशाच्या जडणघडणीसाठी
आदर्श, जबाबदार आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याचं महान कार्य करण्याऱ्या सर्व शिक्षकांना 'शिक्षक दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!#TeachersDay pic.twitter.com/MA6D8refb6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)