तामिळनाडू मध्ये बीएसपी चीफ K Armstrong यांच्या हत्येमधील मुख्य मारेकरीचा शनिवारी रात्री एका एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या एन्काऊंटरला दुजोरा दिला आहे. Thiruvengadam असं त्याचं नाव आहे. चैन्नई मध्ये Madhavaram जवळ हा एन्काऊंटर झाला आहे. के आर्मस्ट्राँग यांची 5 जुलै रोजी चेन्नईच्या पेरांबूर भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळ सहा अज्ञात लोकांनी हत्या केल्याचा आरोप आहे. दुचाकीवरून आलेल्या माणसांच्या एका गटाने आर्मस्ट्राँगवर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे तो रस्त्यावरच गंभीर जखमी झाला. बसपा प्रमुखांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)