राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने अजून एकदा दणका दिला आहे. 'मोदी आडनावावरून' राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्याच्या विरूद्ध राहुल यांनी याचिका केली होती पण ती फेटाळल्यानंतर आता ते उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत. कोर्टाने कमाल शिक्षा सुनावली आहे. तसेच ज्यांंच्या संदर्भात हे वक्तव्य आहे त्यांच्यापैकी कुणी तक्रार केलेली नाही यावरून गांधींच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता पण तो फेटाळण्यात आला आहे. Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव! संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)