Spanish Woman Gang Rape Case: झारखंडच्या दुमका येथे स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मंगळवारी पोलिसांना मोठे यश मिळाले. पोलिसांनी या सामूहिक बलात्कारात सामील असलेल्या आणखी 5 आरोपींना अटक केली. दुमका पोलिसांनी यापूर्वीच 3 गुन्हेगारांना अटक केली होती. अशाप्रकारे पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे. अटकेनंतर सर्व गुन्हेगारांना दुमका न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपींनी महिलेच्या पतीचे स्मार्टवॉच, हिऱ्याची अंगठी, पर्स, ब्लूटूथ, स्पेन बँकेचे क्रेडिट कार्ड, बांगलादेशी नाणी, 11 हजार भारतीय रुपये आणि 300 अमेरिकन डॉलर्स लुटले होते.

दुमका एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. एसपी म्हणाले की, शुक्रवार, 1 मार्चच्या रात्री, भारत दौऱ्यावर दुमका येथे पोहोचलेले स्पॅनिश वंशाचे जोडपे हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरमहाटजवळ तंबू ठोकून रात्री विश्रांती घेत होते. यावेळी आठ आरोपी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आधी या जोडप्याला लुटले आणि नंतर स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित दाम्पत्याने पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली. सर्व आरोपी 18-25 वयोगटातील आहेत. (हेही वाचा: Spanish Travel Vlogger's Assault Case: बलात्काराच्या घटनेनंतर पीडित स्पॅनिश महिलेचे भारताबद्दल उद्गार, काय म्हणाली घ्या जाणून)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)