कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज घोषीत होत आहे. संपर्ण राज्यात निकालाबाबत जोरदार उत्सुकता आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या कार्यालात उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही आज शिगगाव येथील भाजप कँम्प कार्यालयात हजेरी लावली. या दरम्यान, एक वेगळीच घटना पाहायला मिळाली. भाजप कार्यालय असलेल्या इमारतीत एक साप निघाला. जो उपस्थितांनी पकडला. मात्र, बसवराज बोम्मई यांचा प्रवेश होण्याच्या दरम्यान, हा साप पुन्हा निसटला. त्यानंतर साप पुन्हा पकडण्यात आला आणि कार्यालयाचा परीसर सुरक्षत करण्यात आला. वृत्तसंस्था एएनआयने या घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. (हेही वाचा, Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक मतदारसंघनिहाय निकाल आणि लाईव्ह स्थिती, येथे घ्या जाणून)
व्हिडिओ
#WATCH Karnataka CM Basavaraj Bommai reaches the BJP camp office in Shiggaon, a snake found in the building compound slithers away
The snake was later captured and the building compound secured pic.twitter.com/FXSqFu0Bc7
— ANI (@ANI) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)