Karnataka Assembly Election Result 2023 LIVE: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल लाईव्ह आणि अचूक अपडेट कोठे पाहायचा याचा विचार करत असाल तर थांबा. इथे आम्ही आपली मदत करु शकतो. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल आणि तोही मतदारसंघनिहाय आपण जाणून घेऊ शकता. जसे की, तुमच्या मतदारसंघातील कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली आहेत. कोण आघाडीवर आहे याबाबत भारतीय निवडणूक आयोगाने दिलेली अचूक माहिती तुम्ही इथे पाहू शकता. ही माहिती जाणून घेण्यासाठी आणि काय करावे लागेल? त्यासाठी खाली दिली सोपी पद्धत वापरा आणि तुमच्या मतदारसंघात, उमेदवाराची, राजकीय पक्षाची काय स्थिती घ्या जाणून.
कसा पाहाल मतदारसंघनिहाय निकाल?
- सुरुवातीला भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट results.eci.gov.in ला भेट द्या.
- निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट results.eci.gov.in उघडल्यावर 'GENERAL ELECTIONS TO ASSEMBLY CONSTITUENCY MAY 2023' या पर्यायावर क्लिक करा
- निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आपण GENERAL ELECTIONS TO ASSEMBLY CONSTITUENCY MAY 2023 या पर्यायावर क्लिक करताच आपल्यासमोर मतदारसंघ आणि त्यांतील उमेदवारांची स्थिती पाहायला मिळेल. (हेही वाचा, Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल, भाजपची सत्तावापसी की काँग्रेस मारणार बाजी? JD(S) किंगमेकर ठरणार? आज फैसला)
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल आज (13 मे) घोषीत केला जाईल. पाठिमागील 38 वर्षांची सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तर भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा काँग्रेस पक्षाचा मनसूबा लपून राहिलेला नाही. दुसऱ्या बाजूला JD(S) किंगमेकर ठरतो का? याबाबतही उत्सुकता आहे. दरम्यान, कर्नाटकच्या जनतेप्रमाणेच देशभरातील नागरिकांनाही कर्नाटकमध्ये काय होईल याबाबत उत्सुकता आहे. प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते अनेकदा मोठे दावे करतात. अशा वेळी नेमीक कोणती माहिती खरी? हा प्रश्न उरतोच. अशा वेळी आम्ही वर दिलेल्या पद्धतीचा अवलंब करुन अचूक आकडेवारी मिळवू शकता.