केरळमधील न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाकडे पाहता, महिला पोलीस अधिकारी देखील लैंगिक छळापासून सुटू शकल्या नाहीत असे दिसते. एर्नाकुलम येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अलीकडेच एका महिला पोलीस अधिकाऱ्याला, 48 तासांत 300 हून अधिक फोन कॉल केल्याबद्दल एका पुरुषाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या व्यक्तीने महिला पोलीस अधिकाऱ्याला कॉल करून अश्लील शेरेबाजी व टिप्पण्या केल्या होत्या. या महिलेला त्रास देण्यासाठी व्यक्तीने आपल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून वनिता पोलीस स्टेशनच्या अधिकृत लँडलाइनवर (सर्व महिला पोलीस स्टेशन) फोन कॉल्स केले होते. आरोपीने हे सर्व कॉल्स 10 जुलै 2019 ते 11 जुलै 2019 दरम्यान केले होते. ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने फोन उचलला तिला अश्लील शेरे ऐकावे लागले. (हेही वाचा: Delhi Shocker: धक्कादायक! लैंगिक इच्छेची मागणी केल्याने मित्राची गोळ्या घालून हत्या; आरोपीला अटक)
Kerala Court convicts man for sexually harassing police officer by making over 300 calls in 48 hours to police station
Read more here: https://t.co/BusG7iK0ex pic.twitter.com/KEAEyPwKP5
— Bar & Bench (@barandbench) August 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)