SC on Attempt To Murder Case: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या एका महत्वाच्या निर्णयात म्हटले आहे की, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीला 10 वर्षांपेक्षा जास्त सश्रम कारावास दिला जाऊ शकत नाही. आपल्या या ऐतिहासिक निर्णयात, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दोन दोषी- अमित राणा उर्फ ​​कोका आणि दुसऱ्याची शिक्षा कमी केली. या दोघांना एका व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नासाठी 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. अहवालानुसार, हत्येच्या प्रयत्नाची घटना 9 जून 2016 रोजी घडली. अपीलकर्त्यांनी (आरोपी) मंगटू रामवर गोळी झाडली, ज्यामुळे त्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला अर्धांगवायू झाला. नंतर ट्रायल कोर्टाने अपीलकर्त्यांना कलम 307 अंतर्गत दोषी ठरवले आणि त्यांना 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, जी नंतर उच्च न्यायालयाने कायम ठेवली.

नंतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणातील प्राथमिक कायदेशीर मुद्दा हा होता की, हत्येच्या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या आयपीसीच्या कलम 307 अंतर्गत 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते का नाही. खंडपीठाने म्हटले आहे की, शिक्षा ही गुन्ह्याच्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. शिक्षा ही गुन्ह्याशी सुसंगत असावी. कोर्टाने यावर जोर दिला की, कलम 307 च्या भाग I अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा दहा वर्षांची आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा 14 वर्षांवरून 10 वर्षांची सक्तमजुरी केली आणि प्रत्येकी 1,50,000 रुपयांचा दंड कायम ठेवला.

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)